कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच पूर्व राजस्थान आणि गुजरातसाठी उद्यापर्यंत पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, उत्तराखंड आणि मध्य प्रदेशात काही ठिकाणी पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Site Admin | September 6, 2025 3:20 PM | कोकण | गोवा आणि मध्य महाराष्ट्र
कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
