डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

गुजरातमधल्या सौराष्ट्र आणि कच्छमध्ये जोरदार पाऊस

गुजरातमधल्या सौराष्ट्र आणि कच्छमधे नैऋत्य मोसमी पाऊस पुढे सरकल्यामुळे या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. सौराष्ट्रमधल्या बोताड, अमरेली, सुरेंद्रपूर, भावनगर या जिल्ह्यांमधे सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसानं हजेरी  लावली. गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी गांधीनगर इथं तातडीची बैठक बोलावून पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. पावसामुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांमधे एनडीआरएफची ५ आणि एसडीआरएफची २० पथकं तैनात केली असून  पावसाच्या पाण्यात अडकलेल्या शंभरहून अधिक लोकांना वाचवण्यात यश आलं आहे.