त्रिपुरातील अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती, आजही मुसळधार पावसाचा इशारा

त्रिपुरात सतत होणाऱ्या पावसामुळं राज्यातल्या अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून भारतीय हवामान विभागानं आजही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. गोमती आणि मुहुरी या मुख्य नद्यांनी धोक्याची पातळी ओंलाडली असल्यानं शेकडो हेक्टर क्षेत्रावरल्या पिकांची नासाडी झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. 

 

मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांनी आगरतळा इथल्या पूरग्रस्त भागांची पाहणी केली असून परिस्थितीचा आढावा घेतला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.