कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज जोरदार ते अती जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. छत्तीसगड, कर्नाटकचा किनारपट्टी प्रदेश, पश्चिम बंगालचा गंगेच्या खोऱ्यातला प्रदेश, राजस्थान आणि हिमाचलप्रदेशमध्ये देखील आज अती जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे.
अंदमान निकोबार द्वीप समूह, बिहार, झारखंड, ओदिशा, जम्मू, काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान आणि मुझफ्फराबादमध्ये आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
देशाचा वायव्य आणि ईशान्येकडचा प्रदेश, पूर्व, पश्चिम, मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशात पुढले ७ दिवस जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.