डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

September 3, 2024 3:15 PM | Telangana

printer

तेलंगणाच्या काही भागात पावसाचा जोर कायम

तेलंगणाच्या काही भागात पावसाचा जोर आजही कायम आहे. खम्मम, महबूबाबाद आणि सूर्यापेट या जिल्ह्यांमधल्या पूरग्रस्त भागात एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचं बचाव कार्य सुरु आहे. राज्य सरकारनं  ११० मदत छावण्या उभारल्या असून या ठिकाणी ४ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी आसरा घेतला आहे. पुरामुळे आतापर्यंत ५ हजार ४०० कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

 

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी काल पुराचा फटका बसलेल्या  खम्मम या भागाला भेट दिली. पुरामुळे सर्वाधिक बाधित  ५ जिल्ह्यांना आणि मृतांच्या  जवळच्या नातेवाईकांना त्यांनी आर्थिक  मदत जाहीर केली.