डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

October 11, 2024 2:24 PM

printer

पुढल्या दोन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

पुढल्या दोन दिवसांत तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, अरुणाचल प्रदेश आणि गुजरात राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.

 

यामुळे पुढील दोन दिवस देशाच्या पूर्वोत्तर,पश्चिम आणि दक्षिणेकडील द्वीप समुहात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसंच येत्या दोन दिवसांत गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशचा उर्वरित भाग आणि महाराष्ट्र आणि बिहारच्या काही भागांतून नैऋत्य मान्सून परतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.