राज्यात आजपासून पुढचे चार दिवस अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
कोकण तसंच गोव्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या तामिळनाडूच्या किनारपट्टीवर चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होत असून, अरबी समुद्रात पूर्व-पश्चिम दिशा असलेला कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे राज्यासह देशभरात हवामान बदलेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.