डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 21, 2025 3:53 PM | Mumbai Rain

printer

राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार पाऊस

मुंबई शहर, उपनगरासह कोकणात काल वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला असून आणखी चार दिवस राज्यात पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. पालघर, ठाणे, मुंबई जिल्ह्यांना आज आणि उद्यासाठी यलो तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं दिला आहे. मान्सूनच्या अनुकूल स्थितीमुळे वेळेपूर्वीच पावसाला सुरुवात झाली असून यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात गेल्या १५ दिवसांपासून बिगरमोसमी पाऊस होत आहे.

 

मुंबई आणि उपनगरातही विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह पाऊस पडला. ठाण्यातही सोसाट्याचा वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडला.

 

पुणे शहरात पावसामुळे होर्डिंग कोसळून काही दुचाकींचं नुकसान झालं. मुसळधार पावसामुळे शहाराच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं.

 

नाशिक शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काल वादळी वाऱ्यांसह  पाऊस पडला. मौजे सोनगिरी इथं वीज पडून एकाचा मृत्यू झाला.

 

रत्नागिरीत जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही मान्सूनपूर्व वादळी पावसानं झोडपून काढल्यानं जनजीवन विस्कळीत झालं.