September 23, 2024 7:28 PM | Maharashtra | Rain

printer

मुंबईसह राज्याच्या विविध जिल्ह्यांत जोरदार पावसाची हजेरी

राज्यात कालपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाच्या जोरदार सरी अधूनमधून येत आहेत. रत्नागिरीत आज  दुपारपासून मळभ होतं मात्र संध्याकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. 

सांगली जिल्ह्यात तासगाव, पलूस, मिरज, कवठेमहांकाळ आणि वाळवा तालुक्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला असून ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत.

अहमदनगर शहरातही संध्याकाळी जोरदार पाऊस झाला.

 

येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी साेसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.