दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, आणि कच्छमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

दक्षिण गुजरात, सौराष्ट्र, आणि कच्छमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर गुजरात आणि दक्षिण राजस्थानत आज काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारमध्ये  काही ठिकाणी उद्यापर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान, येत्या ३० तारखेपर्यंत गुजरात, आणि महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीजवळ समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्यानं मच्छिमारांना समुद्राच्या न जाण्यचा सल्ला हवामान विभागानं दिला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.