August 20, 2024 7:56 PM | Weather Update

printer

येत्या दोन दिवसात ईशान्य भारतात मुसळधार पाऊसाचा अंदाज

येत्या दोन दिवसांच्या कालावधीत ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडेल असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. बांग्लादेशाच्या मध्यवर्ती भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम तसंच त्रिपुरामध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. 

     त्या शिवाय पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओदिशा या पूर्व भारतातल्या राज्यांमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  केरळ तसंच तामिळनाडू या रांज्यांसह लक्षद्वीप बेटावरच्या तुरळक ठिकाणीही मुसळधार पाऊस पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.