डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

देशाच्या उत्तर भागात उष्णतेची लाट तर महाराष्ट्रासह दक्षिणेत मुसळधार पावसाचा इशारा

कर्नाटकात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. किनारपट्टीलगतचा भाग, उत्तरेकडील बेळगावी, धारवाड, गडग, हावेरी, दक्षिण अंतर्गत प्रदेशातील चिकमंगलूर, कोडगू, शिवमोगा आणि दावणगिरी इथं जोरादार वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला.

 

महाराष्ट्रातही पुणे कोल्हापूर सांगलीसह विविध जिल्ह्यात काल जोरदार पाऊस पडला. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, गोवा आणि महाराष्ट्रात येत्या 24 तासात तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. तुरळक ठिकाणी ताशी 60 ते70 किलोमीटर इतक्या वेगाने वारे वाहतील असा इशाराही देण्यात आला आहे. ईशान्येकडील राज्यातही पावसाचा अंदाज आहे.

 

देशाच्या उत्तर भागात मात्र उष्णतेची लाट आहे. हिमाचल प्रदेशात थंड हवेची ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिमला आणि मनालीमधेही तापमान वाढलं असून घामाच्या धारांनी स्थानिक हैराण झाले आहेत. दरम्यान, दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंडीगड, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा