पोर्तुगालमध्ये उष्णतेची लाट,तापमान ४४ अंशांवर पोहोचण्याची शक्यता

पोर्तुगालमधे आज उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेसोबतच जंगलातल्या वणव्यांमुळे तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत उष्णता आणि वणव्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्याचं पोर्तुगालच्या गृहमंत्री मारिया लुसिया यांनी सांगितलं.

 

उत्तर आफ्रिकेतून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमान सतत वाढत असून पोर्तुगालमध्ये सध्या ३९ ठिकाणी जंगलात आग लागली आहे. यापैकी ९ ठिकाणी परिस्थिती अधिक गंभीर आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.