सर्वोच्च न्यायालयात वक्फ सुधारणा विधेयक २०२५बाबत आज सुनावणी सुरू राहणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचं तीन न्यायमूर्तींचं खंडपीठ काल या विधेयकाबाबत अंतरिम आदेश देणार होतं, मात्र खंडपीठानं विचारलेल्या तीन प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी केंद्र सरकारनं वेळ मागून घेतल्यानं तो स्थगित करण्यात आला. सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती संजयकुमार आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्यापुढे याबाबत सुनावणी सुरू आहे. वक्फ मंडळांचे आणि केंद्रीय वक्फ परिषदेचे सर्व सदस्य मुस्लिमच असायला हवेत, असा आदेश देणार असल्याचं खंडपीठानं स्पष्ट केलं.
दरम्यान, वक्फ कायद्यात सुधारणेवरून पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत न्यायमूर्ती खन्ना यांनी चिंता व्यक्त केली.
Site Admin | April 17, 2025 9:35 AM | Supreme Court | Waqf Act
सर्वोच्च न्यायालयात वक्फ सुधारणा विधेयक २०२५ बाबत आज सुनावणी सुरू राहणार
