आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिभार विधेयकाला संसदेची मंजुरी

‘आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिभार विधेयक, २०२५’ या विधेयकाला आज संसदेची मंजुरी मिळाली. चर्चेनंतर राज्यसभेनं हे विधेयक लोकसभेत परत पाठवलं. गेल्याच आठवड्यात या विधेयकाला लोकसभेची मंजुरी मिळाली होती. हा उपकर अनुचित वस्तूंवरच लागू होणार असून याचं स्वरुप, उत्पादन शुल्क प्रकारचं नसेल, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज राज्यसभेत विधेयक मांडताना स्पष्ट केलं. गुटखा आणि पान मसाल्यावर बंदी लादण्याची मागणी काँग्रेस खासदार शक्तीसिंह गोहिल यांनी या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान केली. शिवसेना खासदार मुरली देवरा यांनी वाढत्या मद्यपानावर चिंता व्यक्त केली. 

 

या विधेयकाच्या माध्यमातून केवळ आरोग्याला हानीकारक असलेल्या वस्तूंवर अधिभार लावला जाईल, जीवनावश्यक वस्तूंवर नाही, असं या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सीतारामन म्हणाल्या. आरोग्य हा राज्य सूचीतला विषय असून या अधिभारातून जमा होणारा महसूल राज्यांनाही दिला जाईल, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.