डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 12, 2025 6:29 PM | Union Health Ministry

printer

आरोग्य मंत्रालयाची हवामान बदल आणि मानवी कार्यक्रमा अंतर्गत अद्ययावत मार्गदर्शक तत्वं जारी

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नागरिकांसाठी हवामान बदल आणि मानवी कार्यक्रमा अंतर्गत अद्ययावत मार्गदर्शक तत्वं जारी केले आहेत.  यानुसार सामुदायिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांमधे चेस्ट क्लिनीक उभारायला सांगितलं आहे. तसंच नागरिकानी अति प्रदूषण असलेले रस्ते, अति वर्दळीच्या ठिकाणी आणि उद्योग, बांधकामाच्या ठिकाणी जाऊ नये असं आवाहनही करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे घरामधे स्वयंपाकासाठी लाकूडफाट्याऐवजी गॅस किंवा इलेक्ट्रिसिटीचा वापर करावा, फटाके वाजवणं टाळावं , सिगारेट ओढू नये, डासांची  अगरबत्ती लावू नये असं आवाहनही यात नागरिकांना केलं गेलं आहे.