डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आज देशात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन

जागतिक उच्च रक्तदाब दिनानिमित्त आज देशात विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन केलं जात आहे. उच्च रक्तदाब आणि त्याचे विविध अवयवांवर होणारे दुष्परिणाम तसंच उच्च रक्तदाबाच्या प्रतिबंधक उपायांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ‘तुमचा रक्तदाब अचूकपणे मोजा, तो नियंत्रित करा आणि दीर्घायुषी व्हा’ ही या वर्षीची संकल्पना आहे.

 

उच्च रक्तदाबाला धोकादायक ठरवणारी बाब म्हणजे या आजाराची कोणतीही खास लक्षणं नाहीत. त्यामुळे यातून हृदयविकार, मूत्रपिंड निकामी होणं, स्ट्रोक यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. म्हणून या बाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक  उच्च रक्तदाब लीग या संस्थेनं २००५ पासून हा दिवस पाळायला सुरुवात केली.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.