डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 17, 2025 1:37 PM | haydrabad

printer

हैद्राबाद मुक्तिसंग्रामातल्या शहीदांना मुक्तिदिनानिमित्त अभिवादन

हैद्राबाद मुक्तिदिन आज साजरा करण्यात येत आहे. प्रचंड जन आंदोलन आणि भारत सरकारच्या पोलीस कारवाईनंतर निजामाच्या राजवटीतून मुक्त होऊन हा प्रांत भारतीय संघराज्यात विलीन झाला. महाराष्ट्रात मराठवाडा मुक्तिदिनही आज साजरा होत आहे.

 

छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. राज्याच्या विविध नद्यांमधलं वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचं काम फक्त कागदोपत्री राहिलेलं नसून, पुढच्या सहा महिन्यात प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

 

तेलंगण, आणि कर्नाटकातही हैद्राबाद मुक्तिदिनानिमित्त ध्वजवंदनेसह विविध कार्यक्रम होत आहेत.

 

   केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी हैद्राबाद मुक्ति संग्रामातल्या सहभागी स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली असून जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.