डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

हरियाणात सप्टेंबरमध्ये महिलांसाठी पहिली जागतिक कबड्डी स्पर्धा

महिलांसाठीची पहिली जागतिक कबड्डी स्पर्धा येत्या सप्टेंबरमधे हरियाणात होणार असून, त्यात 15 देशांचे संघ सहभागी होणार आहेत. जागतिक स्तरावर कबड्डी खेळाला महत्त्व प्राप्त व्हावं, या खेळाचा ऑलिंपिक स्पर्धेमध्ये समावेश व्हावा आणि 2036 मध्ये भारतामध्ये ऑलिंपिक स्पर्धांचं आयोजन करण्याच्या दृष्टीने भारताच्या दाव्याला पाठबळ मिळावं, या उद्देशाने भारतात हरियाणामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे, या स्पर्धांमध्ये इंग्लंड, पोलंड, अर्जेंटिना, इटली आदी देशांच्या संघांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. होलिस्टिक इंटरनॅशनल प्रवासी स्पोर्ट्स असोसिएशनच्या सहकार्याने या स्पर्धा भरवण्यात येणार असून  त्यासंदर्भात हरयाणा सरकारने एक समझोता करार नुकताच केला.