डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

हरविंदर सिंग पॅरालिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय तिरंदाज ठरला

पॅरीस इथं सुरू असलेल्या पॅरालिम्पिक्स स्पर्धेत काल भारतीय क्रिडापटूंनी चमकदार कामगिरी करत चार पदकं पटकावली. यामध्ये दोन सुवर्णपदकांचा समावेश आहे. हरविंदर सिंगनं तिरंदाजीत ऐतिहासिक कामगिरी करत भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. काल रात्री झालेल्या स्पर्धेत पुरुष केरी रिकर्व प्रकारांत हरविंदर ही कामगिरी केली. धरमबीरनं पुरुषांच्या क्लब थ्रो F-५१ अंतिम सामन्यात ३४ पूर्णांक ९२ मीटर चा थ्रो नोंदवून आशियाई विक्रम मोडीत काढला आणि सुवर्णपदक पटकावलं. याच स्पर्धेत प्रणव सूरमाने ३४ पूर्णांक ५९ मीटर थ्रो करत रौप्य पदक जिंकलं.