इंदापूर तालुक्यातील नीरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ ते २०३०-३१ या कालावधीच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे संस्थापक आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचं निर्विवाद वर्चस्व राहिलं आहे. सलग पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीत म्हणजे कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या २५ वर्षात सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.
Site Admin | March 14, 2025 9:16 AM | HarshVardhan Patil
नीरा भिमा साखर कारखान्यावर हर्षवर्धन पाटील यांचं वर्चस्व कायम
