देशातल्या २८ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मिळून २१० पंचायत प्रतिनिधींना नवी दिल्लीत होणाऱ्या यंदाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. आपापल्या गावात पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा, आणि सामूहिक उपक्रम राबवून सुधारणा घडवणाऱ्या सरपंचांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रण देण्यात आलं आहे.
यात महिला प्रतिनिधींची संख्या लक्षणीय आहे. हर घर नल जल योजना, प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना आणि इंद्रधनुष अभियानात या प्रतिनिधींनी भरीव कार्य केलं असल्याचं पंचायती राज मंत्रालयानं म्हटलं आहे.
या प्रतिनिधींचा उद्या एका विशेष कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार असून ”आत्मनिर्भर भारत, विकसित भारत की पहचान” अशी यंदाची संकल्पना आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सभा सार या अप्लिकेशनचं उद्घाटनही यावेळी होईल.