वाशिममध्ये हर घर तिरंगा हर घर स्वच्छता या मोहिमेंतर्गत रॅलीचं आयोजन

वाशिम जिल्ह्यातल्या पंचायत समिती कारंजा इथल्या शिवन बुद्रुक इथं काल हर घर तिरंगा हर घर स्वच्छता या मोहिमेंतर्गत रॅली निघाली. शालेय विद्यार्थ्यांनी यावेळी सार्वजनिक स्वच्छता मोहिम राबवली. राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग तसंच जल आणि स्वच्छता विभागाच्या समन्वयाने हर घर तिरंगा हर घर स्वच्छता स्वतंत्रता ही जनजागृती मोहिम सुरु आहे त्या अंतर्गत ग्रामपंचायतीने ही मोहिम राबवली.