डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

देशवासियांनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहाने भाग घ्यावा, असं केंद्रीय गृहमंत्र्यांचं आवाहन

देशवासियांनी हर घर तिरंगा अभियानात उत्साहाने भाग घ्यावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. येत्या ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान आपापल्या घरांवर तिरंगा फडकावून अभिमानाने स्वातंत्र्यदिन साजरा करावा असं त्यांनी आज समाजमाध्यमावर लिहिलेल्या पोस्टमधे म्हटलं आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून एकता दर्शवणारं हे अभियान गेली दोन वर्षं राष्ट्रीय चळवळ बनल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. आपल्या घरावर फडकणाऱ्या तिरंगी झेंड्याबरोबरचं सेल्फी छायाचित्र काढून हरघरतिरंगा अभियानाच्या संकेतस्थळावर अपलोड करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.