डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 14, 2025 8:10 PM | Har Ghar Tiranga

printer

स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात ‘हर घर तिरंगा’ मोहीम

भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात विविध राज्यांमध्ये हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात येत आहे. चेन्नईजवळ आवडी इथं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर. एल. मुरुगन यांनी तिरंगा रॅलीला संबोधित केलं. केरळमध्ये तिरुवनंतपुरम इथे रेल्वे पोलीस दलानं मोटारसायकल रॅलीचं आयोजन केलं. छत्तीसगडची राजधानी रायपूर इथं मुख्यमंत्री विष्णू देव साय यांच्या उपस्थितीत पदयात्रा पार पडली. बिहारमध्ये समस्तीपूर इथे केंद्रीय गृहराज्य मंत्री नित्यानंद राय यांच्या नेतृत्वात तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. लडाख इथं हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत तिरंगा यात्रा, मोटारसायकल तसंच सायकल रॅली, स्वच्छता मोहीम आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. सिक्किममध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गंगटोक इथल्या नील तारा प्रबोधिनी इथं पत्र सूचना कार्यालयाने विशेष कार्यक्रम आयोजित केला.