हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आजपासून पुढचे तीन दिवस आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या निवासस्थानी तिरंगा फडकावून या अभियानात सहभाग घेतला.
हे अभियान आता लोकचळवळ बनली असून, ज्यामुळे देशात एकतेचा संदेश प्रसारित होत असल्याचं शहा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं.