डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 12, 2025 9:28 AM | HARGHARTIRANGA

printer

हर घर तिरंगा चित्रपट महोत्सवाला प्रारंभ

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या कथा आणि एकतेचं महत्त्व सांगणाऱ्या चित्रपटांच्या हर घर तिरंगा चित्रपट महोत्सवाला काल दिल्लीसह मुंबई, पुणे आणि चेन्नई इथं प्रारंभ झाला. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळानं तीन दिवसांचा हा महोत्सव आयोजित केला आहे. मुंबईत या महोत्सवाचं उद्घाटन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या हस्ते झालं.