August 11, 2025 8:06 PM | Har Ghar Tiranga

printer

‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन

स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरात आयोजित केलेल्या हर घर तिरंगा या मोहिमेत देशात आणि परदेशात राहणाऱ्या प्रत्येक भारतीयाने सहभागी व्हावं असं आवाहन केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी आज केलं. ते आज नवी दिल्ली इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. देशभरातले ५ लाखांहून अधिक स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी होत असल्याचंही शेखावत यावेळी म्हणाले. हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत घर तिरंगा हर घर स्वच्छता, प्रश्नमंजुषा, पत्रलेखन, राखी बनवणे अशा विविध स्पर्धांचाही समावेश आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.