येत्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशभरात हर घर तिरंगा राबवण्यात येत आहे. या निमित्ताने वाशीम शहरातल्या भटक्या समाजाच्या नागरिकांनीही आपल्या पालावर आज तिरंगा फडकावला. या कुटुंबांमधल्या ज्येष्ठांनी लहान मुलांना तिरंग्याचा अर्थ, बलिदानाची गाथा आणि देशभक्तीचं महत्त्व समजावून सांगितलं.
हिंगोली जिल्ह्यात औंढा नागनाथ इथल्या भक्त निवासात शासकीय योजनांची माहिती देणारं मल्टिमीडिया प्रदर्शन सुरू झालं आहे. हे प्रदर्शन केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने आयोजित करण्यात आलं आहे.