हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत राज्यभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. याअंतर्गत आज पनवेल महानगरपालिकेतर्फे तिरंगा सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं. ३००पेक्षा जास्त सायकलस्वारांनी या फेरीत भाग घेतला. या अभियानांतर्गत नांदेड महापालिकाही २ ऑगस्टपासून अनेक उपक्रम राबवत आहे. याचाच एक भाग म्हणून आज हडको इथून तिरंगा बाईक फेरी काढण्यात आली.
Site Admin | August 10, 2025 6:46 PM | Har Ghar Tiranga
राज्यात ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत विविध उपक्रम
