हॅण्डबॉलच्या राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व स्पर्धांचं प्रक्षेपण करण्याच्या उद्देशाने प्रसार भारती आणि भारतीय हॅण्डबॉल संस्था यांच्यात तीन वर्षांच्या कालावधीसाठी सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे आता डीडी स्पोर्ट्स, वेव्हज् ओटीटी आणि प्रसार भारतीच्या इतर वाहिन्यांवरून हॅण्डबॉल स्पर्धांचं प्रक्षेपण होणार आहे. देशात या खेळाचा प्रसार होत उदयोन्मुख खेळाडूंच्या प्रतिभेला वाव मिळण्याच्या उद्देशानं हा करार करण्यात आला आहे.
Site Admin | July 12, 2025 1:44 PM | Hand ball India | Prasar Bharati
प्रसार भारती आणि भारतीय हॅण्डबॉल संस्था यांच्यात सामंजस्य करार
