June 1, 2025 10:02 AM | Hamas | Israel

printer

अमेरिकेच्या इस्रायल समर्थित युद्धबंदी प्रस्तावाला हमासचा प्रतिसाद

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मध्य पूर्वेतील राजदूत स्टीव्ह विटकॉफ यांनी मध्यस्थांना सादर केलेल्या इस्रायल समर्थित युद्धबंदी प्रस्तावाला हमासनं प्रतिसाद दिला आहे. काही पॅलेस्टिनी कैद्यांच्या बदल्यात 10 जिवंत इस्रायली बंधक आणि 18 मृत बंधकांना सोडण्यास आपण तयार असल्याचं हमासनं म्हटलं आहे. हमासनं प्रस्तावित युद्धबंदी योजनेत बदल करण्याची मागणीही केली आहे.