डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

January 30, 2025 5:12 PM | Hamas | Israel

printer

इस्रायल – हमास ओलिस आणि युद्धकैद्यांची देवाणघेवाण करणार

युद्धविराम कराराचा भाग म्हणून इस्रायल आणि हमास आज तिसऱ्या टप्प्यात ओलिस आणि युद्धकैद्यांची देवाणघेवाण करणार आहेत. इस्रायलच्या तीन कैद्यांच्या बदल्यात गाझात अटक करण्यात आलेल्या तीन थाई नागरिकांची सुटका करण्यात येणार आहे. देवाणघेवाणीचा चौथा टप्पा लवकरच ठरवण्यात येणार असल्याचं दोन्हीकडच्या उच्चपदस्थांकडून सांगण्यात आलं आहे. हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हल्ला केल्यानंतर ताब्यात घेतलेल्या इस्रायली कैद्यांना सोडायचं या करारात ठरलं आहे. या बदल्यात इस्रायल १ हजार ९०० पॅलेस्टिनी ओलिसांना सोडणार आहे.