डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

हमासचा प्रमुख याह्या सिनवार इस्राईलने गाझा पट्टीत केलेल्या हल्ल्यात ठार

इस्राईलने गाझा पट्टीत केलेल्या हल्ल्यात हमासचा प्रमुख याह्या सिनवार मारला गेला. सिनवार ज्या इमारतीमध्ये लपला होता, त्यावर इस्राईलनं बॉम्ब हल्ला केला.मात्र, हमासनं सिनवारच्या मृत्यूला अद्याप दुजोरा दिलेला नाही. सिनवर हा हमासच्या राजनैतिक विभागाचा प्रमुख होता. तसंच तो इस्माइल हानिए याचा उत्तराधिकारी होता. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला इस्राईलवर झालेल्या हल्ल्याचा सिनवार हा प्रमुख सूत्रधार होता. दरम्यान, अजून हे युद्ध संपलेलं नाही, असं इस्राईलचे प्रधानमंत्री बेन्यामिन नेतान्याहू यांनी सांगितलं. काही आठवड्यांपूर्वी इस्राईलनं लेबनानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्लाह हा मारला गेला.