केंद्रासह राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त अकोला जिल्हा परिषदेतर्फे २१ नोव्हेंबरपासून हमारा शौचालय, हमारा भविष्य ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
यात जिल्ह्यातील सर्व गावात वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालये दुरुस्ती करून वापरात आणण्यात येणार आहेत. येत्या दहा डिसेंबरला मानवी हक्क दिनापर्यंत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.