तेलंगणात हैदराबाद इथं ३७ नक्षलवादी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत मुख्य प्रवाहात सामील झाले. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये आझाद उर्फ कोय्यादा सांबय्या, रमेश उर्फ अप्पासी नारायण, तसंच एर्रा उर्फ मुचाकी सोमादा या राज्य समितीच्या तीन वरिष्ठ सदस्यांसह २५ महिलांचाही समावेश आहे. या सर्वांनी हैदराबाद इथं पोलिसांकडे आपल्याकडील एके सत्तेचाळीस राफलसह ८ शस्त्र आणि काही जिवंत काडतुसं सुपुर्द केली.
समर्पण केल्यानंतर राज्य समिती सदस्यांना प्रत्येकी २० लाख रुपये दिले गेले, तर या सर्वांसाठी लावलेल्या बक्षिसाची रक्कम धनादेश आणि धनाकर्षाद्वारे दिली गेली आहे. या सगळ्यांना यापुढेही सहाय्य दिलं जाईल असं तेलंगणाचे पोलीस महासंचालक बी शिवाधर रेड्डी यांनी सांगितलं.