डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

February 25, 2025 3:07 PM | Hackathon

printer

विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी ‘इनेव्हेट विथ गो आयस्टॅट्स’ हॅकेथॉनचं आयोजन

विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आकडेवारीवर आधारित विदा उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीनं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय ‘इनेव्हेट विथ गो आयस्टॅट्स’ ही हॅकेथॉन आयोजित करत आहे. मायगोव्ह मंचावर ही स्पर्धा होणार असून त्यात सहभागासाठी आजपासून येत्या ३१ मार्चपर्यंत नोंदणी करता येईल. पदवी तसंच पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे विद्यार्थी भाग घेऊ शकतील. सर्वोत्कृष्ट ३० स्पर्धकांना रोख पारितोषिकं देण्यात येतील. पहिलं पारितोषिक दोन लाख रुपयांचं असून दुसऱ्या क्रमांकाची दोन पारितोषिकं प्रत्येकी एक लाख रुपयाची असतील. तिसऱ्या क्रमांकाची दोन पारितोषिकं प्रत्येकी ५० हजार रुपयांची असतील तर प्रत्येकी २० हजार रुपयांची २५ उत्तेजनार्थ परितोषिकं देण्यात येतील, असं सरकारी पत्रकात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा