बुडापेस्ट इथं सुरू असलेल्या ग्युलई इस्तवान मेमोरियल हंगेरियन ऍथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या गुलवीर सिंगने ३ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत पाचवं स्थान पटकावून बिगर ऑलिम्पिक स्पर्धेत विश्वविक्रम रचला. हे अंतर त्याने ७ मिनिटं ३४ सेकंद ४९ मिनिसेकंदात पूर्ण केलं. गुलवीरची ही युरोपमधली ही पहिली ट्रॅक रेस होती.