January 8, 2026 1:40 PM | Gyanranjan

printer

प्रसिद्ध साहित्यिक ज्ञानरंजन यांचं मध्यप्रदेशात जबलपूरमध्ये निधन

प्रसिद्ध साहित्यिक ज्ञानरंजन यांचं काल मध्यप्रदेशामधल्या जबलपूर इथं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. काल सकाळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. 

 

महाराष्ट्रातल्या अकोला इथं २१ नोव्हेंबर १९३६ ला ज्ञानरंजन यांचा जन्म झाला. शिक्षण आणि नोकरीनिमित्त महाराष्ट्र, राजस्थान, दिल्ली, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशात त्यांनी आपलं जीवन व्यतित केलं. ज्ञानरंजन यांचे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध असून ‘कबाडखाना’ या त्यांच्या पुस्तकामुळे त्यांना विशेष ओळख मिळाली. त्याचप्रमाणे ‘पहल’ या मासिकाचं संपादन त्यांनी अनेक वर्षं केलं. साहित्य भूषण, मध्यप्रदेशाच्या साहित्य परिषदेचा पुरस्कार, शिखर पुरस्कारासह ते अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत. जबलपूर इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.