शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची आज ५५६ वी जयंती आज साजरी होत आहे. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी गुरुनानक जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु नानक यांचं जीवन आपल्याला सत्य, न्याय आणि सहिष्णुता या मूल्यांची शिकवण देतं; प्रत्येकाने गुरु नानक देव यांचे आदर्श आपल्या जीवनात आत्मसात करावे आणि समृद्ध राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्यांनी दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करावे असं आवाहनही राष्ट्रपति मुर्मू यांनी आपल्या संदेशात केलं आहे.गुरु नानक देवांचं जीवन आणि संदेश मानवतेला चिरस्थायी मार्गदर्शन आणि प्रेरणा देणारा असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान गुरु नानक जयंती निमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजंन करण्यात आलं आहे.
कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा आज देशभरात श्रद्धापूर्वक पारंपरिक पद्धतीने साजरी होत आहे. ठिकठिकाणी त्यानिमित्त दीपोत्सवांच आयोजन करण्यात आलं आहे.