शीखांचे नववे गुरू, गुरू तेग बहादूर यांचा ३५०वा हुतात्मा दिन आज आहे. गुरू नानक देव यांच्या शिकवणीच्या प्रसारासाठी गुरू तेग बहादूर यांनी देशभर प्रवास केला होता. त्यांनी ११६ शाबद आणि १५ राग यांची रचना केली त्याचा समावेश आदि ग्रंथांमध्ये केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरू तेग बहादूर यांना आदरांजली वाहिली. तेग बहादूर यांची शिकवण लोकांना न्यायाच्या मार्गावर चालण्यासाठी आणि देशात एकता, सौहार्दासाठी काम करण्यास प्रेरणा देत असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात नमूद केलं आहे.
Site Admin | November 24, 2025 1:41 PM | Guru Tegh Bahadur Ji
शीखांचे नववे गुरू, गुरू तेग बहादूर यांचा ३५०वा हुतात्मा दिन