गुजरात आणि राजस्थानमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मध्य प्रदेश ओडिशा आणि पश्चिम बंगालचा काही भाग, सिक्किम, तामिळनाडू, पुदुचेरी, उत्तराखंड आणि कराईकलमध्येही पावसाची शक्यता आहे.
हिमाचल प्रदेशातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्या पुढील तीन दिवस मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, केरळ आणि माहे इथं वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.