गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला यश, प्रधानमंत्र्यांनी मानले आभार

गुजरातमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपानं निर्विवाद यश मिळवलं आहे. भाजपानं 68 पैकी 60 नगरपालिकांवर विजय मिळवला आहे. समाजवादी पक्षाला 2 जागा मिळाल्या असून कॉँग्रेसला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. जुनागड महानगरपालिकेत भाजपानं 60 पैकी 48 जागा जिंकल्या आहेत. भाजपानं 16 तारखेला मतदान झालेल्या तीनही ग्रामपंचायतींवरही विजय मिळवला. 213 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत.