डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

February 15, 2025 1:34 PM | dahod | GUJRAT

printer

दाहोद जिल्ह्यात झालेल्या अपघातात 4 जण ठार

गुजरात राज्यातल्या दाहोद जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या रस्ते अपघातात चार जण जागीच ठार झाले तर सहा जण  जखमी झाले आहेत. लिमखेडाजवळ इंदोर-अहमदाबाद महामार्गावर आज पहाटे साधारणपणे पावणे तीन वाजता  हा अपघात झाला.

 

प्रयागराज इथल्या महाकुंभावरून हे यात्रेकरू घरी येत असताना पर्यटक व्हॅन रस्त्यात थांबलेल्या ट्रकवर आदळून हा अपघात झाला. मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे. सर्वजण  भरूच जिल्ह्यातल्या अंकलेश्वर आणि अहमदाबादच्या ढोलका इथले रहिवासी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.