डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 1, 2025 8:20 PM | Gujarat Fire

printer

गुजरातमध्ये कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू

गुजरातमध्ये बनासकांठा जिल्ह्यात डीसा इथे आज एका फटाक्याच्या कारखान्यात आग लागून १७ जणांचा मृत्यू झाला. या कारखान्यात आधी फटाक्यांचा स्फोट झाला, त्यामुळे इमारतीचा काही भाग कोसळला आणि अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण आणलं असली तरी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. 

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे आणि मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.