गुजरातमध्ये उद्या मंत्रिमंडळ विस्तार

गुजरातमध्ये मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल वगळता इतर सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या होणार आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या उपस्थितीत गांधीनगर इथे हा शपथविधी होईल. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात समाविष्ट झालेल्या मंत्र्यांना राज्यपाल पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.