October 18, 2025 4:58 PM | Gujarat Cabinet

printer

गुजरात सरकारच्या नवनियुक्त मंत्र्यांनी स्विकारला पदभार

धनोत्रयोदशीच्या मुहूर्तावर गुजरात सरकारच्या नवनियुक्त मंत्र्यांनी आपापल्या खात्यांच्या पदभार स्वीकारला. उपमुख्यमंत्री हर्ष सांघवी यांनी धार्मिक पूजा केल्यानंतर पदभार स्वीकारला.  नरेश पटेल, ऋषिकेश पटेल, डॉ. प्रद्युम्न वाजा आणि रोजगार-कौशल्य आणि रोजगार राज्यमंत्री कांतीलाल अमृतीया यांनीही त्यांच्या खात्यांचा पदभार स्वीकारला. प्राथमिक माध्यमिक तसंच प्रौढ शिक्षण राज्यमंत्री रीवाबा जडेजा यांनीही त्यांच्या खात्याचा पदभार स्वीकारत पक्षाचे आभार मानले.