गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. त्यात २१ नवीन मंत्र्यांनी शपथ घेतली. माजी गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आधीच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री असलेले प्रफुल्ल पानसेरिया यांना कॅबिनेट मंत्री पदी बढती मिळाली. क्रिकेटपटू रविंद्र जडेजा याची पत्नी रिवा बा यांनीही राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी गांधीनगरमध्ये आयोजित कार्यक्रमात नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते. या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मंत्रीमंडळानं काल राजीनामा दिला होता.