डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

गुलेन बॅरी सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल

गुलेन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल झालं आहे. या ७ सदस्यीय पथकात राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था, तसंच राष्ट्रीय विषाणू संस्थेतल्या तज्ञांचा समावेश आहे. 

 

या आजाराची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता १०१ झाली आहे. त्यातले ८१ पुणे महापालिका क्षेत्रात, १४ पिंपरी चिंचवड भागात, तर ६ इतर जिल्ह्यांमधले आहेत. याप्रकरणी २५ हजारांहून अधिक घरांची पाहणी महापालिकेनं केली आहे.