गुईलेन बॅरे सिंड्रोम आजार संसर्गजन्य नसून नागरिकांनी घाबरू नये – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे शहरात सध्या गुईलेन-बॅरे सिंड्रोम या आजारानं डोकं वर काढलं आहे, मात्र हा संसर्गजन्य आजार नाही, त्यामुळं नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज केलं. याबाबतच्या  आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. गुईलेन-बॅरे सिंड्रोम आजाराची लागण झालेल्यांची संख्या आता ५९ झाली आहे.